in

बदलापुरात गॅस गळती; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोठी कारवाई

मयुरेश जाधव | बदलापूर एमआयडीसीतील नोबेल इंटरमिडीएट्स कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना गॅस गळती झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. याप्रकरणी आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. नोबेल इंटरमीडिएट कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश आता एमपीसीबीने दिले आहेत.

बदलापूर एमआयडीसीतील नोबेल इंटरमिडीएट्स कंपनीत सल्फ्यूरिक अॅसिड आणि मिथाईल बेंझाईन या दोन रसायनांवर रिऍक्टरमध्ये प्रक्रिया केली जात असताना त्यात सल्फ्युरिक अॅसिड जास्त पडून रिऍक्टरचा जाब वाढल्यामुळे रिॲक्टरमधून गॅसची गळती झाली आणि काही क्षणातच हा गॅस बदलापूर शहरात पसरला. यामुळे अनेकांना श्वास घ्यायला त्रास होणं, डोकेदुखी असे त्रास जाणवू लागले.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तासाभरात ही गळती रोखली. या सगळ्या घटनेनंतर आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे आणि त्यांच्या पथकाने बदलापूर एमआयडीसीत जाऊन नोबेल इंटरमिडीएट्स कंपनीची पाहणी केली. यावेळी ज्या रसायनांची निर्मिती आणि प्रक्रिया करण्याचं काम सुरू असताना गॅस गळतीचा प्रकार घडला. त्या रसायनांची निर्मिती करण्याची परवानगीच या कंपनीकडे नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या कंपनीला तातडीने उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत.

दरम्यान अंबरनाथ आणि बदलापूर एमआयडीसीत अशाच पद्धतीने अनेक रासायनिक कंपन्या परवानगी नसताना सुद्धा रासायनिक प्रक्रिया करत असल्याने सलग दोन घटना देखील समोर आल्या होत्या. त्यामुळे रासायनिक कंपन्यांवर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कालनदीच्या पात्रात दुषित पाणी सोडल्याचा प्रकार; जिल्हा प्रशासन करतेय तक्रारीकडे दुर्लक्ष

Maharashtra Unlock | राज्यात 5 टप्प्यात निर्बंध उठवणार, कोणते जिल्हे अनलॉक?