in

भारताच्या कोरोना स्थिती हाताळण्याच्या कार्यशैलीवर जागितक माध्यमांची टीका

भारतात कोरोना परिस्थिती भयंकर आहे. जगभरातील माध्यमांनी भारताच्या कोरोना हाताळणीवर टीका केली आहे. मोदी सरकारच्या कार्यशैलीवर अनेक माध्यमांनी ताशेरे ओढले आहेत. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, ऑक्सिजन सिलिंडर्सची कमतरता, रेमडेसिविरचा तुटवडा, स्थलांतरितांचे हाल यावर जागतिक माध्यमांनी खेद व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या स्वत:च्या आकलनाने काही निर्णय घेतले. तज्ज्ञांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या चुकांचे परिणाम आज भोगावे लागत आहेत’’ असे ब्रिटनच्या गार्डियन वृत्तपत्राने अग्रलेखात म्हटले आहे. ‘‘नरेंद्र मोदींच्या अतिआत्मविश्वासामुळे हे सारे घडले. मोदींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्बंध कसे राखावेत याचा विचार करायला हवा होता. आपण जे बोलतो ते करतो हे दाखवायला हवे होते. भविष्यातील इतिहासकार या निर्णयांबाबत मोदींचे कठोर मूल्यमापन करतील,’’ असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या महत्त्वाच्या वृत्तपत्राने भारतात टाळेबंदी फार आधी लावली गेल्याबाबत टीकास्त्र सोडले आहेच आणि दुसरी लाट वाढत असूनसुद्धा क्रिकेट, कुंभमेळा आणि इतर धार्मिक कार्यक्रम कुठल्याही नियमनाविना साजरे झाल्याबद्दल त्यांनी केंद्रीय नेतृत्त्वाचे वाभाडे काढले. हे सारे टाळता आले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मधून साधणार देशवासीयांशी संवाद

World Malaria Day 2021 : जाणून घ्या वर्ल्ड मलेरिया डे चा इतिहास, महत्त्व