in

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोनं स्वस्त

gold rate

गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या भावात 0.14 टक्क्यांनी घसरण झाली. त्यामुळे सोनं 46,793 रुपये प्रतितोळा या पातळीवर येऊन पोहोचले. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा प्रतितोळा दर 47,451 रुपये इतका होता. तो आता आठवड्याच्या शेवटापर्यंत 46,793 रुपयांच्या पातळीवर आला आहे. त्यामुळे आठवडाभरात सोनं 500 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

तर दुसरीकडे शुक्रवारी चांदीच्या दरात 0.05 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा भाव 64,150 रुपये प्रतिकिलो या पातळीवर येऊन पोहोचला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी एका किलो चांदीसाठी 65,261 रुपये मोजावे लागत होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

parel – mumbai

लालबागच्या राजाच्या दरबारात पत्रकारांना धक्काबुक्की