होळीपासून सोन्याच्या दरात आज सतत घसरण होत आहे. गुरुवारी,MCX (Multi commodity exchnag) वर सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली, त्यानंतर जून सोन्याचे वायदे प्रति 10 ग्रॅम 44977 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करीत आहेत. त्याचबरोबर चांदीची किंमत आज 0.35 टक्क्यांनी घसरून 63595 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. त्याचबरोबर सोन्याचा फ्युचर ट्रेड 127.00 रुपयांच्या घसरणीसह 44,510.00 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करीत आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, आज दिल्लीत 47170 रुपये, मुंबईत 44,360 रुपये, चेन्नईमध्ये 45,400 रुपये आणि कोलकातामध्ये प्रति 10 ग्रॅम 46,390 रुपये आहेत.
चांदीची किंमत
चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ते दिल्लीत प्रति किलो 63600 रुपये आहे. याशिवाय मुंबईत 63600, चेन्नईमध्ये 67600 आणि कोलकातामध्ये 63600 रुपये किलो आहे.
दिल्ली सराफा बाजारातील बुधवारचे भाव
बुधवारी, दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 118 रुपयांची घट झाली होती, त्यानंतर 24 कॅरेट सोन्याची नवीन किंमत आता प्रति 10 ग्रॅम 43,925 रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत आज प्रति किलो 771 रुपये नोंदविण्यात आली, त्यानंतर ही किंमत 62,441 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली.
Comments
Loading…