in

Gold- Silver Price| पाहा सोन्याचे आजचे दर

सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीबाबत बोलायचं झालं तर आज चांदीमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्स वर गुरुवारी सोन्याचा दर 0.02% च्या तेजीमुळे 48,794 रुपये प्रति तोळा झाला आहे. तर जुलैसाठीच्या चांदीची वायदे किंमत 71,400 रुपयांवर ट्रेड करत आहे. बुधवारी चांदीचे दर 72,631 रुपये प्रति किलो होते.

मार्चमध्ये सोन्याचे दर जवळपास 44000 रुपये प्रति तोळा या सर्वात निचांकी स्तरावर पोहोचले होते. मात्र या महिन्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळते आहे. असं असलं तरीही अद्यापही गेल्यावर्षीच्या सर्वोच्च किंमतीपेक्षा दर कमी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उजनी धरणातून पाणी रद्दचा लेखी आदेश जारी

Maratha Reservation : संभाजीराजेंची राजकीय खलबतं… शरद पवार व राज ठाकरेंची घेतली भेट