in , ,

सोने – चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घट, पहा आजचे दर

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती परंतु आता अमेरिकेच्या फेडरल रिजर्व बैठकीनंतर आर्थिक धोरण नियंत्रित करण्याच्या निर्णयामुळे सोने आणि चांदीचे भाव घसरल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,२४० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती.

मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,२४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,४४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,२४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,२४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०६ रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नाही. दिल्ली सराफा बाजारात चांदी 21 रुपयांपर्यंत महाग झाली आहे. चांदीची नवीन किंमत आता 59,429 रुपये प्रति किलो आहे. एक दिवस आधी ते 59,408 रुपये प्रति किलोग्राम होती. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 22.68 डॉलर प्रति औंस आहे.

सध्या सोन्याचा दर गेल्या 6 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. कॉमेक्सवरील सोन्याची सध्याची किंमत $ 1750 च्या पातळीवर आली आहे, तर दुसरीकडे, MCX वर सोन्याची किंमत 46 हजारांच्या पातळीवर चालली आहे. एसपीडीआर गोल्ड ईटीएफच्या होल्डिंगमध्ये 8.1 टन घट झाली आहे. गुरुवारी ते 0.8 टक्क्यांनी कमी होऊन 992.65 टनावर आले आहे. यंदा अमेरिकन बाँडचे उत्पन्न देखील सातत्याने वाढले आहे. फेडशिवाय इतर काही देशांमध्ये अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक धोरण निंयत्रित करण्याची बाबत मौल्यवान धातूंवर दबाव निर्माण झाला आहे. देशांतर्गत बाजाराता पितृपंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या मागणीत घट झाली आहे. सणवार जवळ आल्यामुळे दर कमी राहण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईतील शाळा सुरु होऊ शकतील, पण…

महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट