in

Gold Silver Rate Today : सोन्याचा भाव वधारला, पाहा आजचे भाव

सोन्याच्या किंमतीत सतत घसरण थांबली आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 438 रुपयांनी वाढली. त्याचबरोबर या काळात चांदीच्या दरात प्रति किलो 633 रुपयांची वाढ झाली आहे. परदेशी बाजारात खरेदी परतल्याने देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीचे भाव वाढले आहेत. मात्र, ही तेजी टिकाऊ नाही. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीचे दर पुन्हा घसरू शकतात. (For the first time this week, the price of gold increase, know the price of 10 grams of gold)

दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी 99.9 टक्के सोन्याचा भाव 438 रुपयांनी वाढून 46,214 रुपये झाला आहे. तर मंगळवारी किंमत 45,776 रुपये प्रति दहा ग्रॅम होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात, किंमत प्रति औंस 1,800 डॉलरपर्यंत वाढली आहे.

सोन्याप्रमाणे चांदीच्या भावातही तेजी पहायला मिळत आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमतीत 633 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीची किंमत 61,507 रुपये प्रति किलो वरून 62,140 रुपये किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या किंमती कोणत्याही बदलाशिवाय 23.79 प्रति औंस डॉलरवर स्थिर आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पालघरच्या बुलेट ट्रेनचा मार्ग काही अंशी मोकळा

Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून निवडणुका घेणार – छगन भूजबळ