in

Gold Silver | सलग तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले; जाणून घ्या आजचे दर

आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या वायदा किंमतीमध्ये घट झाली आहे. एमसीएक्सवर आज सोन्याचा वायदा भाव हा 49,159 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. तर चांदीच्या (Silver) वायदा किंमतीत 0.2 टक्क्यांनी वाढून 71,370 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे.

जागतिक बाजारात सोन्याची किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून 1,893.78 डॉलर प्रति औंस होती. चांदीचा दर 27.63 डॉलर प्रति औंस आणि प्लॅटिनमचा दर 0.1 टक्क्यांनी घसरून 1,160.81 डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी 2020-21 मध्ये भारतात सोन्याची आयात 22.58 टक्क्यांनी वाढून 34.6 अब्ज डॉलर म्हणजेच 2.54 लाख कोटी रुपये झाली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यलयाचे गेट बंद

‘मुंबईत पाणीच साचणार नाही असा दावा केलाच नव्हता’