in

‘संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यात जास्त आनंद मिळतोय’

संजय देसाई, सांगली | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. औरंगाबादला संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय असं दिसतंय, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केलीय. ते आज सांगलीच्या झरे मध्ये बोलत होते.

जनाब संजय राऊत महाराष्ट्रात औरंगाजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहली जाते आणि त्यावरून उस्मानाबादेत दंगे होतात… आणि तुमचा महाराष्ट्रातील कमकुवतपणा व लाचारी लपविण्यासीठी तुम्ही भाजपाला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहता.. जनाब राऊत तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नाही का अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

    ऐन हिंदु सणाच्या दिवशी महाराष्ट्राची व हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज लावण्यावरून ज़र उस्मानाबादमध्ये पोलीसांवर दगडफेक होते.. त्यावेळेसे ऐरव्ही उस्मानाबादला धाराशिव करू म्हणणाऱ्यांच्या हाताला  काय लकवा मारतो काय.. तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री  स्वांतत्र्यवीर सावरकरांवर उलट सुलट लिहतात…यावेळेस सत्ता टिकविण्यासाठी  तुमच्या वाघाचा ससा होतो का? 

 तुमच्या औरंगाबादमध्ये गरोदर महिलांवर अत्याचार होतो तरी त्यावर आपल्याला एक ओळ खरडावी वाटत नाही.औरंगाबादला संभाजी नगर करू म्हणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय.. असंच दिसतंय..

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावतीत दलित समाजाच्या लोकांवर जातीय अत्याचार;100 जणांनी गाव सोडून ठोकला पाझर तलावावर मुक्काम

…म्हणून खासदार इम्तियाज जलील भडकले