in

”आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढून प्रेस घेतली होती का ?”, गोपीचंद पडळकर यांचा सवाल

राज्यात 18 वर्षावरील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केल्यानंतर पुरेशा लसींअभावी लसीकरणाची मोहीम राबवता येणार नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितेल. त्यांच्या या विधानावर टीका होत आहे.

गोपीचंद पडळकर यांनी यावर सांगलीत पत्रकारांशी बोलताना, “काल सकाळी राज्याच्या पालकमंत्र्यांनी घोषित केलं की एक तारखेपासून आम्ही 18 ते 45 वयोगटातील लोकांचे आम्ही लसीकरण करणार आहोत. नंतर 4 वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले असल्याचे मत त्यांनी मांडले. तसेच सकाळी जी प्रेस घेतली होती, ती काय गांजा ओढून घेतली होती का ? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, उठ सूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. यांना केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. मुळात विचारसरणी एक नसताना, कोणताही अजेंडा नसताना ते एकत्र आले आहेत, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MI vs RR | राजस्थानच्या जोस बटलर आणि जयस्वालची ‘यशस्वी’ सुरुवात

MI vs RR : मुंबईसमोर विजयासाठी 172 धावांचं लक्ष्य