in

आटपाडी राडा प्रकरण; गोपीचंद पडळकरांचा अटकपुर्व जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होणार

संजय देसाई, सांगली | सांगली आटपाडी राडा प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली. त्या अर्जावर आज सुनावणी झाली असून न्यायालयाने तो अर्ज फेटाळला. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. जगताप यांच्यासमोर सुनावणी झाली.

दरम्यान, आमदार पडळकर यांच्या अर्जाच्या सुनावाणीसाठी सरकार पक्षातर्फे रियाझ जमादार, तर बचाव पक्षाकडून ॲड. प्रकाश जाधव यांनी काम पाहिले. तर पाटील यांच्याकडून सरकारपक्षातर्फे ए. एन. कुलकर्णी, तर बचाव पक्षाकडून ॲड. दीपक शिंदे यांनी काम पाहिले.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत झालेल्या या राड्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राजू जानकर यांनी केला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करीत गाडीची तोडफोड केली. त्यानंतर परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या. दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा, तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडून आटपाडी तालुक्यात छापेमारी करण्यात आली. आमदार पडळकर, तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे राजू जानकर यांची आलीशान चार वाहने जप्त केली. त्यानंतर आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी अटक पूर्वसाठी धाव घेतली. त्यावर आज सुनावणी झाली असून तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे कोणत्याही क्षणी दोघांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या; सातारा लोकरंगमंच संघटनेची मागणी

१९ नोव्हेंबरला सर्व टीकेला पुराव्यांसह उत्तर देईन- विक्रम गोखले