अजय देवगण चा ‘दिलवाले’ ते ‘तान्हाजी ‘पर्यंत एखाद-दुसरा चित्रपट असा असेल, ज्यात तो स्टंट करताना दिसला नसेल!, म्हणजेच, स्टंट आणि अजय हे समीकरण तसे जुनेच आहे. अजयचे चित्रपटातील स्टंटवर खूप प्रेम आहे, असे आपण म्हणू शकतो कि ही देणगी आणि हा धाडसीवृत्ती त्याला ‘वारसा’ म्हणून मिळाली आहे. वास्तविक विरू देवगण, अजय देवगणचे वडील हे भारतीय चित्रपटसृष्टीचे स्टंट आणि अॅक्शन कोरिओग्राफर होते.
मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यापूर्वीच अजय स्टंट्स दाखवयाचा. एके काळी अजय देवगण बिगबि यांचा,बंगल्या समोर स्टंट करून दाखवायचा . हेच नव्हे तर अजय देवगणने एक गंग देखील बनवली होती. अजय त्या गंगचे नेतृत्व करायचा.
‘नुक्कड गंग’ बदल सांगितला किस्सा
अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांनी या किस्याबद्दल एका चॅट शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितल. अभिषेकच्या सांगण्यानुसार, अजयकडे त्यावेळी खुली जीप होती तो त्यावर प्रतीक्षाच्या समोरील चौकात बरेच स्टंट करायचा. अजय त्यावेळी महाविद्यालात होता अजय ३- ४ लोकांचा टोळीचे नेतृत करायचा जी ‘नुक्कड गंग’ म्हणून ओळखली जात असे.
Comments
Loading…