in

‘तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता’, गाण्यांचे गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन

ज्येष्ठ गीतकार आणि आंबेडकरी चळवळीला दिशा देणारे लोककवी हरेंद्र जाधव (वय ८७) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. हरेंद्र जाधव यांनी तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, यासारखी जवळपास दहा हजार लोकप्रिय गाणी गाणी लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजविले होते.

गेल्या काही वर्षांपासून हरेंद्र जाधव हे पक्षाघाताने आजारी होते. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. अखेर प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हरेंद्र जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता. हरेंद्र जाधव हे पेक्षाने शिक्षक होते. त्याचबरोबर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावीत होऊन ते समाजकार्यात ओढले गेले. हरेंद्र जाधव यांनी १० हजारहून अधिक गाणी लिहिली आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘मुंबईत दिवसाला दोन ते अडीच लाख लोकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट’

दिल्लीतील लॉकडाउन वाढवला; कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय