in

‘एका पत्रावरून एवढी कारवाई होऊ शकते का’? मुश्रीफ यांचा सवाल

अनिल देशमुख यांच्यावर झालेली सीबीआय कारवाई म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे , असा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात केला. एका पत्राने एवढी मोठी कारवाई होऊ शकते का, असा सवाल करत भाजपची ही राजकीय खेळी असून सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही मुश्रीफ यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या प्रकरणात सीबीआयनं आज अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, काही ठिकाणांवर छापेही टाकण्यात आले आहेत. मुंबई आणि नागपुरातील देशमुख यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत.

भाजपच्या आदेशानंतरच लेटरबॉम्बची राजकीय खेळी –

‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी जो लेटर बॉम्ब टाकला, तो राजकीय होता. भाजपच्या आदेशानंतरच ती राजकीय खेळी खेळण्यात आली होती. त्यांच्या एका पत्रावरून एवढी मोठी कारवाई होऊ शकते का? एखादा अधिकारी पुराव्याशिवाय पत्र देतो, आणि त्या पत्राच्या आधारावर पुराव्याशिवाय चौकशी होऊ शकते, हे सारे केवळ राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्यासाठीच आहे हे स्पष्ट होते, असंही मुश्रीफ म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘अनिल देशमुखांवरील कारवाई सुडबुद्धीनं नसावी अशी आशा’

एन. व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश