राज्यात पारा चढलेला असून अपेक्षेनुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथीलही तापमान वाढलेले दिसून येत आहे. विदर्भात ३० मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक भागात तापमानाचा कमाल पारा ४० अंश नोंदवला गेला आहे. मात्र आता हळुहळू उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथीलही तापमान वाढलेले दिसून येत आहे. कोकणातील तापमानवाढीचा फारसा त्रास जाणवत नसला तरी यंदा तिथंही पारा चढला आहे.
३० मार्च व ३१ मार्च रोजी पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात व संलग्न मराठवाडा भागात तापमान वाढीचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला असून तापमान ४२ अंशच्या वर जाण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीतही तापमानात वाढ
रत्नागिरीत मंगळवारी आणि बुधवारी उन्हाचे चटके अतिशय तीव्रतेने जाणवणार आहेत. शुक्रवारी रत्नागिरीत नोंदवलेले तापमान हे गेल्या २५ वर्षांमधील सर्वात उष्ण असे तिसऱ्या क्रमांकाचे तापमान आहे. या आधी २०११ आणि २००४ मध्ये तापमानाचा पारा अनुक्रमे ४०.६ आणि ४०.२ अंश सेल्सिअस नोंदला गेला होता.
Comments
Loading…