in ,

डोक्यावरचं छप्पर गेलेल्यांना ‘नाम’ फाऊंडेशनचा मदतीचा हात

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कराड ,पाटण आणि शिराळा तालुक्यातील पूरग्रस्त बाधित 700 कुटुंबाना 5000 पत्र्याचे वाटप नाम फाउंडेशनचे विश्वस्त मकरंद अनासपुरे आणि निवृत्त आयएएस अधिकारी इंद्रजित देशमुख, गणेश थोरात, देसाई, गटविकास अधिकारी पवार, यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाठार येथे करण्यात आले.

मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या तडाख्याने या परिसरातील अनेक गोरगरीबांना मोठा फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत या कुटुंबांचे संसार पुन्हा उभे राहण्यासाठी मदतीचा हात म्हणून नाम फाउंडेशनने पुढाकार घेतलाय. तीन तालुक्यातील सुमारे 700 गरजू कुटुंबांना हा एक मोठा दिलासा ठरला आहे. अशा नैसर्गिक आपत्तीत संकटात सापडलेल्या गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी नाम नेहमीच पुढे येईल.मात्र त्याचबरोबर आपण सर्वांनी मिळून याकामी पुढाकार घेणे हीच आपली खरी संस्कृती असल्याचं अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी यावेळी म्हटलंय. याकामी मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही मकरंद अनासपुरे यांनी केले

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चंद्रपुरकरांचा यंदा POP मूर्तींना नकार; १०० टक्के पर्यावरणपूरक गणेशोत्सव

coronavirus updates: कोरोनाच्या मृत्युसंख्येत मोठी घट!