in

परमबीर सिंग याचिका सुनावणी : “तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात” – हायकोर्ट

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. तुम्ही केलेले आरोप हे केवळ ऐकीव गोष्टींवर केलेत का, असा प्रश्न न्यायालयाने परमबीर सिंग यांना विचारला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची महनिरीक्षकपदी बदली झाल्यानंतर राज्यातील आयपीएस लॉबीत नाराजीनाट्याला सुरुवात झाली.

परमबीरसिंग यांनी लेटरबॉम्ब फोडत गृहमंत्र्यांवर आरोप केले. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार संबंधित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंग यांनी दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता यांचे खंडपीठ याचिकेवर सुनावणी करणार आहे.

जाणून घ्या सुनावणीतील काही महत्त्वाचे मुद्दे

“मुंबई पोलीस आयुक्त या नात्यानं याप्रकरणी गुन्हा दाखल करणं ही तुमचीच जबाबदारी होती. तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात”, हायकोर्टाची परमबीर सिंग यांच्यावर बोचरी टीका.

तुमचे वरीष्ठ जरी कायदा मोडत असतील तरी, त्याची तक्रार देऊन गुन्हा दाखल करण ही तुमचीच जबाबदारी आहे – मुंबई उच्च न्यायालय

परमवीर सिंगांच्या वकिलांनी रश्मी शुक्ला ह्यांच्या अहवालाचा संदर्भ दिला.या प्रकरणात एफआयआर का दाखल केला नाही? मुख्य न्यायमूर्ती

उच्च न्यायालयपरमवीर सिंग यांच्या वकिलांनी तेव्हाच्या डीजीपी महाराष्ट्र ह्यांना राज्य गुप्तचर विभाग आयुक्त यांनी लिहिलेले पत्र वाचले.

परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ वकिलांच्या वतीने देण्यात आला.

या प्रकरणात एफआयआर कुठे नोंदवला आहे? उच्च न्यायालयाकडून परमवीर सिंगांच्या वकिलांना सातत्याने प्रश्न.

गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का? – हायकोर्टाचा याचिकाकर्ते परमबीर सिंग यांना सवाल.

हे केवळ ऐकीव गोष्टींवर केलेले आरोप आहेत का? – हायकोर्ट.

तुमच्या ऑफिसर्सनी तुम्हाला तोंडी सांगितलं, मात्र तुमच्याकडे याचे काहीही पुरावे आहे का? – हायकोर्ट

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘हेच का तुमचं हिंदुत्व ?’ मनसेच्या अविनाश जाधवांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Aadhaar-Pan Linking | लेट लतीफांमुळे आयकर विभागाची वेबसाईटच झाली क्रॅश