in

‘ओळखपत्र नसलेल्यांचे लसीकरण कसे करणार?’

लसीकरणासाठी आवश्यक असलेली ओळखपत्रे नसणाऱ्यांचे लसीकरण कसे करणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बुधवारी केली आहे. तसेच अशा व्यक्तींसाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत याची माहिती सादर करण्याचे आदेशही दिले.

लसीकरणासाठी आधार ओळखपत्र, पॅनकार्डसारखी सात ओळखपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत. त्यापैकी एका ओळखपत्राच्या आधारे लसीकरणासाठी नोंदणी केली जाऊ शकते. मात्र सातपैकी एकही ओळखपत्र नसलेल्या नागरिकांचे लसीकरण कसे करणार याबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही. केंद्राच्या नियमावलीत या नागरिकांसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत यालाही प्रसिद्धी देण्यात आलेली नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाचा मुद्दाही याचिके द्वारे उपस्थित करण्यात आला आहे. अशा व्यक्ती लसीकरणाची संमती देण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे अशांचे लसीकरण कसे करणार, याबाबतही स्पष्टता नसल्याचा याचिकाकर्त्याचा दावा आहे. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात विशेषत: ग्रामीण भागांतील जनतेत अद्यापही गैरसमज आहेत. नागरिकांच्या मनातील हा गैरसमज दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध पातळीवर जनजागृती करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारला देण्याची मागणीही अन्य एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘या’ शहरात 51 इमारती अतिधोकादायक

Pune MIDC Fire : कंपनी मालक निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी