in

Santosh Bangar: रेमडेसिवीरसाठी हिंगोलीच्या आमदाराने मोडली 90 लाखाची एफडी

हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कोरोनावर प्रतिबंधक अशा रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी आपली स्वतःची मुदत ठेव (एफडी) मोडल्याची घटना घडली आहे. तब्बल 90 लाखाची एफडी मोडून त्याने जिल्ह्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध केले आहे. त्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा संपला होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज लक्षात घेता आमदार संतोष बांगर यांनी स्व;खर्चाने हे इंजेक्शन मागवण्याचा निर्णय घेतला. एका खासगी वितरकास स्वत:च्या फिक्स डिपॉझिटमधील 90 लाखांची रक्कम उपलब्ध करुन दिली आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या इंजेक्शनच्या पुरवठ्यानंतर संबंधित वितरकास जिल्हा प्रशासन जेव्हा निधी देईल, तेव्हा तो आमदार बांगर यांनी मिळणार आहे. त्यातही ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्यांनी ही तूर्त उपलब्ध करुन दिली आहे. आता दोन दिवसांत हे इंजेक्शन्स उपलब्ध होतील, अशी आशा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Karnataka Covid lockdown | कर्नाटकात उद्यापासून लॉकडाऊन…

Pat Cummins; भारताच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची धाव; ५० हजार डॉलरची केली मदत