in

IPL 2021 Remaining Matches : आयपीएलच्या नव्या तारखा आल्या समोर!

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील वेळापत्रकात बदल न करण्याच्या घेतलेल्या पवित्र्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाला मोठा धक्का बसला. पण बीसीसीआयनं मास्टरप्लान तयार केला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आयपीएलचे उर्वरित सामने याच वर्षी खेळवण्याचा पक्का निर्धार केला आहे. त्यादृष्टीनं बीसीसीआयनं २९ मे रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे आणि त्यात या नव्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.

बीसीसीआय आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यासाठी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या ३० दिवसांच्या विंडोचा विचार करत होती. यात त्यांना चार आठवडे मिळणार होते आणि शनिवार-रविवार डबल हेडर सामने खेळवून स्पर्धा पूर्ण करण्याचा विचार सुरू होता.

पण, आता अपडेट्स माहितीनुसार ECBनं नकार दिल्यानं बीसीसीआयनं आयपीएलचे उर्वरित सामने १९ किंवा २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. भारत- इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका १४ सप्टेंबरला संपणार आहे आणि लंडनहून खेळाडू थेट UAEत दाखल होतील.

आता त्यांच्यासमोर कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( CPL) वेळापत्रकाची अडचण आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगचे ( Caribbean Premier League ) २०२१ मधील पर्व २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. यात बदल करण्याची विनंती बीसीसीआयकडून केली जाऊ शकते. बीसीसीआयच्या या नव्या तारखांनुसार १० डबल हेडर सामने होतील, ७ दिवस प्रत्येकी एक सामना आणि ४ प्ले ऑफचे सामने होतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Home Isolation ban | फ्लॅट, बंगल्यात राहणारे लोक कोव्हिड सेंटरला कसे येतील?

पदोन्नती आरक्षण | “जीआर असंवैधानिक, तातडीने रद्द करा”