in

12 वी नापास युवकाने फेसबुकवर पसरविले हनी ट्रॅपचे जाळे

12 वी नापास युवकाने फेसबुकवर हनी ट्रॅप चे जाळे पसरविल्याचे उघड झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांच्या सायबर शाखेने आरमोरी येथून आरोपी युवकाला अटक केली आहे. नत्थू खेवले 39 असं या आरोपीचे नाव आहे. मिळेल ते काम करणारा हा युवक कोरोना लॉकडाऊन काळात हाती रोजगार नसल्याने मोबाईलवर अति सक्रिय झाला. याच काळात  नत्थू खेवले याने इंटरनेटवरून प्रॉक्सी सर्व्हरचे तंत्र शिकून घेतले. या तंत्रातून तयार केलेल्या बनावट आयडीचा शोध घेणे क्लिष्ट ठरते. युवती असल्याचे भासवून फेसबुकवर युवकांना आमंत्रण देत त्यांचे अश्लील व्हिडिओ करण्याचा धंदा या युवकाने सुरू केला. काही दिवसांनी हेच व्हिडिओ वापरून खंडणी वसुली सुरू केली. हा प्रकार अनेक लोकांसंदर्भात झाला असला तरी कुणी स्वतःहून पुढे येत नव्हते. एका पिडीत युवकाने धाडस दाखवून याबाबत तक्रार केली. गडचिरोली पोलिसांनी सायबर गुन्हा दाखल माग काढून आरोपी युवकाला अटक केली. पोलिसांनी अशा पद्धतीने जाळ्यात फसलेल्या व्यक्तींची संख्या अधिक असल्याची भीती व्यक्त केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिलासादायक! देशभरात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट

…अन्यथा आम्ही मानवी भिंत उभी करून जलसमर्पण करणार : शेतकऱ्यांचा इशारा