in

रामलीला मैदानात उभारणार 1000 बेडचे रूग्णालय, दिल्ली सरकारचा निर्णय

दिल्ली सरकारने रामलीला मैदानात एक हजार बेडचे अस्थायी रूग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात 500 बेड आयसीयूचे असतील आणि 500 बेड नॉर्मल राहणार आहे. दिल्ली सरकारमधील उच्चस्तरीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोविडच्या रूग्णांची वाढती संख्या, बेडची कमतरता आणि औषधांच्या टंचाईने दिल्ली सरकारची झोप उडविली आहे. दिल्लीत दररोज 20 हजारापेक्षा जास्त नवीन रूग्णांची नोंद होत आहे. अलिकडेच ऑक्‍सिजनच्या अभावामुळे 20 जणांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत करोना रूग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच कोविडमुळे मरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारी आणि खासगी रूग्णालयात रूग्णांना जागा मिळत नाही आहे. ऑक्‍सिजनची कमतरता आहे.

अशात, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रूग्णांना रामभरोसे न सोडता तात्पुरती उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकार दिल्लीतील ऐतिहासीक रामलीला मैदानावर एक हजार खाटांचे अस्थायी रूग्णालय बनविण्याच्या योजनेवर काम करीत आहे. यामुळे बेडसाठी इकडेतिकडे भटकणा-या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाचा कहर सुरूच… दिवसभरात ६६, ३५८ कोरोनाबाधित, तर ८९५ मृत्यू

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; ‘या’ विषयांवर चर्चा होण्याची शक्यता