in ,

1 तारखेला लसीकरण कसे करावे; यावर राजेश टोपेंनी व्यक्त केली चिंता

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण, लसीकरण पुरवठा हे मोठं आव्हान आहे. सीरम संस्था आणि भारत बायोटेकला पत्र दिले आहे पण त्यांनी अजून काही उत्तर दिलं नाही, अशी माहिती देत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 1 तारखेच्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला आहे.

‘राज्यात लसीकरण 1 मेपासून करण्याचे नियोजन आहे. लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. 7 हजार कोटींची लस लागणार आहे. सर्वांना लस मोफत द्याची की दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत द्यावा याचा अहवाल कॅबिनेटला अहवाल दिला आहे, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल निर्णय जाहीर करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितले.

तसंच, राज्यात लसीचा साठा गरजेचा आहे. त्यासाठी सीरम संस्था आणि भारत बायोटेकला पत्र व्यवहार केला आहे. पण, त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नाही, त्यामुळे 1 तारखेला लसीकरण कसे करावे, हा मोठा प्रश्न आहे, अशी चिंताही टोपेंनी बोलून दाखवली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘देर आए’….विजयी मिरवणुकांवर बंदी; निवडणूक आयोगाचा निर्णय

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी सामना