in

अमरावतीत शेकडो दलित अद्यापही गावाबाहेरच; गृहमंत्र्यांच्या कारवाईच्या आदेशानंतरही तोडगा नाही

सूरज दहाट, अमरावती | अमरावती जिल्ह्यात जातीय द्वेषातून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून दानापूर येथील शंभर अनुसूचित समाजाच्या लोकांनी गाव सोडले असून गावाशेजारील पाझर तलावाजवळ आश्रय घेतला आहे. या प्रकरणात स्थानिक प्रशासन समजून काढण्यात अपयशी ठरली तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कारवाईचे आदेश देऊनही तोडगा निघाला नाही आहे. त्यामुळे ३६ तासानंतरही दलित कुटुंब गावाबाहेरच आहे.

अमरावतीत दलित समाजाच्या लोकांवर जातीय अत्याचार;100 जणांनी गाव सोडून ठोकला पाझर तलावावर मुक्काम

देशात स्वातंत्र्यांचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा होत असतांना पुरोगामी महाराष्ट्रात जातीचा कलंक पुसता पुसल्या जात नाही फुले, शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या राज्यात अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील जातीय द्वेषातून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून दानापूर येथील शंभर अनुसूचित समाजाच्या लोकांनी गाव सोडले असून गावाशेजारील पाझर तलावाजवळ आश्रय घेतला असून त्यामुळे जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत गावात परतणार नसल्याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे आता या नागरिकांचे घरदार बेवारस झाले असून गावातील त्यांच्या मालमत्तेच्या सरक्षणाची जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने सध्या खळबळ उडाली आहे.

दानापूर येथील दलित बांधवाची दानापूर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदणच्या एक शेत पलीकडे या दलितांची शेती आहे. परंतु गावच्या सवर्णांनी या दलितांना त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित बांधवांचा आहे. या ठिकाणी आंदोलन करत असूनही दोन दिवसांपासून तोडगा निघाला नाही तर प्रकरण सामंजस्याने मिटवू अस चांदुर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भिवंडीत जुन्नरच्या व्यापाऱ्याचे पावणे तीन लाख चोरले, घटना सीसीटीव्हीत कैद

सरकारने 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी – प्रशांत दामले