in

ICAI CA परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध नियोजीत परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता इन्सि्टट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडिया सीए फायनल आणि इंटरमिजीएटच्या २१ मे पासून सुरू होणाऱ्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं आयसीएआयकडून ट्विटद्वारे सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व विद्यार्थ्यांच्या सुरेक्षाचा विचार करता, सीए फायनल आणि इंटरमिजीएटची २१ आणि २२ मे पासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाठी २५ दिवसांचा वेळ मिळेल, अशा पद्धतीने परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात येईल, असं आयसीएआयच्या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

DC vs RCB Live Score, IPL 2021 | दिल्लीच्या डावाला सुरुवात

“मुंबईतील मृत्यूंचा आकडा लपवला जातोय”, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र