सोशल मीडियावर नेहमी अनेक गोष्टी चर्चेत येतात. सध्या सोशल मीडियात ‘सैतान शूज’ चर्चेचा विषय ठरत आहेत. सैतान शूज तयार करताना यातील लाल रंगासाठी मानवी रक्ताचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे. याच गोष्टीवरुन हे शूज आणि निर्माती कंपनी आता वादात सापडली आहे. ब्रूकलिन कंपनीनं या शूजची निर्मिती केली आहे. सोशल मीडियावर या शूजवर जोरदार टीका केली आहे. तर सुप्रसिद्ध नाईकी कंपनीनंही हे शूज तयार करणाऱ्या MSCHFया कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. कंपनीची कोणतीही परवानगी किंवा कल्पना न देता या शूजवर नाइकी कंपनीचा लोगो वापरण्यात आला आहे, असा आक्षेप नाइकीनं घेतला आहे.
MSCHF कंपनीने सैताना शूज’ २९ मार्च रोजी बाजारात आणले. कंपनीनं हे शूज सुप्रसिद्ध रॅपर लिल नाससोबत पार्टनरशिप करत तयार केले आहेत. न्यूयॉर्कच्या ब्रूकलिन कंपनीसोबत मिळून तयार केले गेलेल्या ‘सैतान शूज’च्या केवळ ६६६ जोडीच उत्पादन केलं गेलं आहे. एका जोडची किंमत जवळपास १०१८ डॉलर म्हणजे ७५ हजार रुपये इतकी आहे. शूजवर लाल रंगासाठी मानवी रक्ताचा वापर केला गेला आहे. ‘नाइकी’नं शूज निर्माती कंपनीवर परवानगीविना कंपनीचा लोगो वापरल्याचा ठपका ठेवला आहे.
Comments
Loading…