in

अमेरिकेत 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लस

जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. यातच अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतातूनही काही देशांना कोरोना लसींचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये अमेरिकेतही कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. १९ एप्रिलपासून सर्व सज्ञान व्यक्तींना कोरोना लस देण्याचे बायडन यांनी जाहीर केले आहे.

१९ एप्रिल २०२१ पासून १८ वर्ष आणि त्यावरील सर्व व्यक्ती कोरोना लसीकरणासाठी पात्र असतील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे. अमेरिकेतील बहुतांश नागरिकांना १ मे २०२१ पर्यंत कोरोना लस देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय बिल्डर योगेश देशमुख यांना ईडीकडून अटक

Corona Vaccine | लस उत्पादन वाढवण्यासाठी ३ हजार कोटींची गरज : अदर पूनावाला