in

‘पांढऱ्या’ सोन्याची साठवणूक करा ; यंदा कापसाच्या दराच तेजी कायम राहणार

संग्रहित

यंदा अतिरीक्त पावसामुळे खरीपातील उत्पादनाची गणितेच बिघडलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. पण उत्पादन घटल्याने दरही वाढणार आहेत.सोयाबीनच्या बाबतीत हे होत नसले तरी कापसाचे मात्र, दर वाढत आहेत. राज्यात 85 लाख गाठी कापसाच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पावसानंतर बदलल्या परिस्थितीमुळे हे लक्ष्य कमी करुन 75 लाखावर आलेले आहे.

त्यामुळे दरात वाढ होत आहे. सध्या कापसाला 7000 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. तर हमीभाव हा 6025 ठरवून देण्यात आलेला आहे.हमीभावापेक्षा जास्तीचा दर मिळत असून भविष्यातही दर वाढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कापसाची तोडणी केली आहे.

त्यांनी साठवणूकीवर भर दिला तर अधिकचा फायदा होणार आहे. सुरुवातीला राज्यभरात 85 लाख गाठीचे उत्पादन होईल, असा अंदाज होता. आता 75 लाखावर तो आला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रात सापडले यूपी-एमपीचे गावठी कट्टे

नाशिकचे प्रख्यात तबलावादक पंडित विजय हिंगणे यांचे निधन