in ,

Maharashtra Corona | राज्यात नवीन बाधितांसह मृतांच्या आकड्यात वाढ

Computer image of a coronavirus

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. नव्या करोनाबाधितांचा आकडा देखील सोमवारच्या १२०० नी वाढून ९ हजार ३५० पर्यंत गेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह, राज्य सरकारची चिंता वाढली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजार ३५० पर्यंत गेला आहे. त्यामुळे एकूण आकडा ५९ लाख २४ हजार ७७३ इतका झाला आहे. त्यापैकी सध्या राज्यात १ लाख ३८ हजार ३६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.आज राज्यात कोरोनावर मात करून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा १५ हजार १७६ इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनावर मात केलेल्या राज्यातल्या रुग्णांची संख्या ५६ लाख ६९ हजार १७९ इतकी नोंदवण्यात आली आहे.

मृतांच्या संख्येत वाढ

गेल्या २४ तासांत राज्यात ३८८ कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आली असून एकूण कोरोना मृतांचा आकडा आता १ लाख १४ हजार १५४ इतका झाला आहे. राज्याचा मृत्यूदर १.९३ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाआवास अभियानाअंतर्गत 3 लाख 23 हजार लाभार्थ्यांनी केला गृहप्रवेश

”प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारणार”