in ,

Maharashtra Corona : रुग्णसंख्येत वाढ; 12 हजार 207 नवे कोरोनाबाधित

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या खालावत असताना आज गुरुवारी अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. राज्यात 12 हजार 207 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून मृतांचा आकडा 393 इतका नोंदवण्यात आला आहे.

राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू करून ५ दिवस उलटले असून आज नव्या करोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढला आहे.आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 12 हजार 207 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. हा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये 10 हजारांच्या घरात होता. त्यामुळे अचानक इतक्या मोठ्या रुग्णवाढीवर आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 58 लाख 76 हजार 087 इतकी झाली आहे. यापैकी 1 लाख 60 हजार 693 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मृतांचा आकडा 393 इतका नोंदवण्यात आला आहे.दुसरीकडे ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ५६ लाख ८ हजार ७५३ इतका झाला आहे. त्यामुळे अजूनही राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या वरच असून तो ९५.४५ इतका नोंदवण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

71 हजार रिक्षा चालकांच्या खात्यात लॉकडाऊन मदत जमा

“कर भरला नाही म्हणून सरकार व्याज घेतंय” म्हणतं कंगनाचे रडगाणं सुरूच