in ,

Maharashtra Corona:दिलासादायक! बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ

राज्यासाठी दिलासादायक वृत्त आहे. आजच्या आकडेवारीत बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्य कुठेतरी कोरोनाच्या महामारीतून बाहेर येत असल्याचे म्हणता येईल.

राज्यात आज दिवसभरात 71,736 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 36 लाख 1 हजार 796 वर पोहचला आहे. राज्यात आज दिवसभरात 48,700 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या 43 लाख 43 हजार 727 वर पोहोचली आहे. तर 524 रुग्णांचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 65 हजार 284 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 6 लाख 74 हजार 770 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सहा दिवसांत 4 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र दुसरीकडे कोरनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.  मागील सहा दिवसांत राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीची किंमत कमी करा , सरकारचं सीरम भारत बायोटेकला आवाहन

धकधक गर्ल माधुरीने घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस