बारामती | रुपेश होले

इंदापूर पोलीसांनी आज मोठी कारवाई केली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी देवकर एमआयडीसीतील एका कंपनीत बेकायदा ऑक्सिजन सिलेंडरचा केलेला साठा जप्त केला आहे. यामधे पोलीसांनी 51 भरलेले तर 21 रिकामे ऑक्सिजन सिलेंडर जप्त केले आहेत.

पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली होती. यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. Yaxis Structural Steel Pvt. Ltd या कंपनीत पोलीसांनी धाड टाकली. त्यावेळी हा साठा असल्याची पोलीसांना खात्री झाली. या कारवाईत एकुण ७ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, ११ एप्रिल २०२१ रोजी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भातील काही निर्देश देण्यात आले आहेत. यामधे ऑक्सिजन फक्त अत्यावश्यक सेवांना ( मेडीकल संबंधित ) वापरास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या कंपनीत एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा कसा ? करण्यात आला असा प्रश्न निर्माण झाला आहे.