in

Indian Railway|रेल्वेने प्रवास करताय ? नव्या गाईडलाईन्स नक्की वाचा

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र आणि राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या परिस्थितीत भारतीय रेल्वेनेही प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. विशेषतः राज्यांनी जारी केलेल्या कोरोना विषयक गाईडलाईन्सचं पालन करणंही महत्त्वाचे आहे, असं रेल्वेकडून सांगण्यात आलंय. रेल्वेकडून सातत्याने ट्विट करुन प्रवाशांना याबाबत माहिती दिली जात आहे.

प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी विविध राज्यांनी दिलेल्या आरोग्यविषयक गाईडलाईन्स वाचाव्यात, असे ट्विट करुन रेल्वे मंत्रालयाने केले आहे. ट्विटमध्ये रेल्वेनं प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी राज्यांचे दिशानिर्देश वाचले पाहिजेत, असं सांगितले आहे. प्रवासी ज्या राज्यांमधून प्रवास करणार आहेत त्या राज्यांच्या गाईडलाईन्स वाचाव्यात, असं रेल्वेने सांगितलं आहे.

कोरोना चाचणी बंधनकारक

रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांनी त्या नियमांविषयी जागरुक राहावे आणि पालन करावे, असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलंय. काही राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारकर करण्यात आला आहे. प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट दाखवणं आवश्यक आहे. राज्यस्थान सरकारनं इतर राज्यांमधून येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक केलं आहे.

थर्मल स्कॅनिंग, रेल्वे स्थानकांवर मास्क घालणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

बिहारनं महाराष्ट्र, पंजाब आणि केरळ येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात महाविकास आघाडी सरकार काँग्रेसमुळे; नाना पटोलेंचे खळबळजनक वक्तव्य

शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल