in ,

भारतीय महिला संघाच्या खेळाडूला कोरोनाची लागण

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर , आक्रमक खेळाडू युसूफ पठाण आणि इरफान पठाण याच्यानंतर आता भारतीय महिला संघाची धडाकेबाज खेळाडू हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण झाली आहे. हरमनप्रीतला कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने टेस्ट केली असता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ती घरातच आयसोलेट असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे.

भारतीय महिला संघाची नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेत हरमनप्रीत भारतीय संघात सामिल होती. ही मालिका पार पडल्यानंतर हरमनप्रीतला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने तिने टेस्ट केली असता तिला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. हरमनप्रीतशिवाय भारताच्या आणखी चार माजी खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारताचा ‘या’ माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

1 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार…