in ,

IPL 2021; आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज दिसणार नवीन जर्सीत

आयपीएलची तीन विजेतेपदे पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या पर्वासाठी आपली नवीन जर्सी समोर आणली आहे. चेन्नई सुपर किंग्जने पहिल्यांदाच आपल्या जर्सी मध्ये बदल केला आहे तर यावेळी आयपीएलमध्ये चेन्नईचे खेळाडू नवीन जर्सीत दिसतील. ही जर्सी पर्यावरणाला समोर ठेऊन बनवण्यात आली असून या जर्सीसाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या गेल्या आहेत.

या जर्सीसाठी १५ प्लास्टिकच्या बाटल्या रिसायकल करून वापरण्यात आल्या आहेत. तसेच या नव्या जर्सीमध्ये वापरण्यात येणारे दर्जेदार पॉलिस्टर इतरांपेक्षा 90 टक्के कमी पाणी शोषून घेते.

चेन्नईच्या जर्सीचा रंग आधीप्रमाणेच पिवळा आहे, पण खांद्यावर भारतीय लष्कराचा सन्मान म्हणून आर्मीच्या ‘कॅमोफ्लॉज’चा समावेश करण्यात आला आहे. शिवाय फ्रेंचायझीच्या ‘लोगो’च्या वरती तीन स्टार आहेत. 2010, 2011 आणि 2018मध्ये आयपीएलचा किताब जिंकल्याचे हे तीन स्टार दर्शवतात

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ? भाजपचा सवाल

नागपूरात एकाच बेडवर पॉझिटिव्हसह संशयित रुग्णावर उपचार