9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी विविध संघांचे कॅम्प सुरु झाले आहेत. मुंबई इंडियन्सचं सराव शिबीर मुंबईतच आयोजित करण्यात आल आहे. त्याचनुसार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपण मुंबई इंडियन्स संघाच्या शिबीरात दाखल झाल्याची माहिती दिली आहे.
इंग्लंडविरुद्धची मालिका गाजवून भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आगामी आयपीएल 2021च्या 14 व्या हंगामासाठी मुंबईच्या कॅम्पसाठी पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सला सहाव्यांदा विजेतेपदाची ट्रॉफी मिळवून देण्यासाठी रोहित प्रयत्नांची पराकष्ठा करेल. आतापर्यंत रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या टीमने 5 वेळा आयपीएल जेतेपदाची ट्रॉफी मिळवली आहे.
मुंबई इंडियन्सचे हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि सूर्यकुमार यादव 9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या हंगामासाठी सुरु असलेल्या सराव शिबीरासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने आपल्या ट्विटरवरुन या तिघांचाही फोटो ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे.
Comments
Loading…