in

IPL 2022: आयपीएलचा 15 वा हंगाम ‘या’ तारखेपासून होणार सूरू

आयपीएलच्या 2022 च्या सीझनचं वेळापत्रक निश्चित झालं आहे. या सीझनची सुरुवात 2 एप्रिलपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. यावेळी स्पर्धेत 10 टीम सहभागी होणार आहे. या सीझनमध्ये पहिली मॅच चेन्नई विरुद्ध मुंबईमध्ये होणार आहे.

आयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये लखनऊ आणि अहमदाबादचे दोन संघ सहभागी होतील. त्यामुळं यंदा टीमची संख्या 10 वर पोहोचली आहे. 15 व्या हंगामात एकूण 74 मॅच होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

माहितीनुसार आयपीएलच्या 15 व्या सीझनची सुरुवात 2 एप्रिलला चेन्नईमधून होणार आहे. आयपीएलचा हा सीझन 60 दिवस सुरु राहील, अशी माहिती आहे. तर, आयपीएलची फायनल 4 किंवा 5 जूनला होणार आहे. या सीझनमध्ये प्रत्येक टीमला 14 मॅच खेळण्याची संधी असेल. त्यापैकी 7 मॅच होम ग्राऊंडवर तर उर्वरीत 7 मॅच दुसऱ्या टीमच्या ग्राऊंडवर होणार आहेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एसटीचं विलिनीकरण केल्यावर अनेक मंडळांचं विलिनीकरण करावं लागेल- शरद पवार

ST Employee Strike | परिवहन मंत्री अनिल परब एसटी संपासंदर्भात मोठी घोषणा करणार