in

“राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?”

“राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?” असा सवाल भाजपाने विचारला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “केंद्राकडून मिळालेल्या २६.७७ लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला १७ हजार ऐवजी ६० हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?…” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

जालना जिल्ह्याला लसीचे अधिकचे डोस मिळाले असल्यास ते लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी दिले गेले असावेत, असंदेखील टोपे पुढे म्हणाले. लसीकरणचा वेग वाढवण्यासाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि उपकेंद्रांना लसींचं वाटप केलं आहे, असं टोपेंनी सांगितलं. राज्याच्या तुलनेत जालन्यातील लसीकरणाचा वेग कमी असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यातील इतर जिल्ह्यात सरासरी २७ टक्के लोकांचं लसीकरण होत असताना जालन्यात मात्र हीच टक्केवारी १८.१ टक्के असल्याची आकडेवारी टोपेंनी दिली.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘ठाकरे सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळे आरक्षण रद्द’

लढा संपलेला नाही, पुढची कारवाई करणार – अशोक चव्हाण