in , ,

JAi BHIM चित्रपटाची पुनरावृत्ती; आदिवासी महिलांना मारहाण

नमीत पाटील | पालघर | JAI BHIM सिनेमा प्रदर्शित झाल्या नंतर जगभरात त्याची चर्चा झाली आणि या सिनेमात झालेल्या अन्याय विरुद्ध अनेकांनी नाराजगी व्यक्त केली. या सिनेमाची चर्चा अजून संपली नाही तर अशीच एक घटना वसईमध्ये पाहायला मिळाली. आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली त्यानंतर अनेकांनी वसई पोलीस उपायुक्तांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  

वसईत चोरीच्या संशयावरून पोलिसांनी मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी महिलांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी पापडी येथील आठवडा बाजारात पाच ते सहा आदिवासी महिला खरेदीसाठी गेल्या असता लोकांना त्या चोरी करत असल्याचा संशय आला व त्यांनी या महिलांना वसई पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ व एका पोलिस कर्मचाऱ्याने या महिलांना लाठीने मारहाण करून त्यांना बाजारात पुन्हा न दिसण्याची धमकी दिली. पुरुष पोलिसाने महिलांना केलेल्या मारहाणीच्या प्रकारावरून आदिवासी संघटना आता आक्रमक झालेल्या पाहायला मिळत असून. वसईचे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान २५ नव्हेंबरला भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा) यांनी जेल भरो आंदोलन करणार अशी माहिती दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ST Employee Strike | एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीची ऑफर; अनिल परब

एसटी खासगीकरणाच्या दिशेनं?, महामंडळानं घेतला ‘हा’ निर्णय