in

CBI raid on Anil Deshmukh | “सीबीआयने बाहेरच्या वस्तू देशमुखांच्या घरी नेल्या”

अनिल देशमुख सीबीआयच्या रडारवर असल्याचे चित्र आहे. आज अनिल देशमुखांच्या मुंबई आणि नागपूरच्या घरावक छापे टाकण्यात आले. यामुळे राष्ट्रवादीत वेगळीच अस्वस्थता आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीबीआयवरच निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केला आहे. सीबीआयने बाहेरच्या वस्तू देशमुखांच्या घरी नेल्याचं त्यांनी म्हटलंय

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी लेटरबॉम्ब फोडल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची खुर्ची धोक्यात आली होती. यानंतर उच्च न्यायालयाने हे आरोप गंभीर असून त्याच्या सीबीआय चौकशीचे निर्देश दिले. अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता सीबीआयने फासा आवळायला सुरुवात केलीय.

न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा दुरुपयोग करून सीबीआय राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा वापर राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच होत आहे,’ असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. ‘अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले.

याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली. उच्च न्यायालयानं केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही,’ याकडंही जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Remdesivir in Maharashtra: अखेर ज्यादाचे रेमडेसिवीर महाराष्ट्रात येणार… केंद्र सरकारचा निर्णय

वेळेच्या 10 मिनिटंही जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम लागू होणार