in

‘फडणवीसांनी श्रेय घेण्याचे काम करु नये’, जयंत पाटलांचा टोला


जलसंपदा मंत्री जयंत पाटीलांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय आहे. ‘फडणवीसांनी श्रेय घेण्याचं काम करु नये’ असं जयंत पाटील यांनी म्हटलय आहे. पुण्यात उद्घाटनावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच इतर देशांमध्ये जी तयारी दुसऱ्या लाटेसाठी केली गेली ,ती आपण आधीच करायला हवी होती, असं जयंत पाटील म्हणाले.


सर्वांना लस मिळेपर्यंत तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे . तसंच मोफत लसीकरणाचा निर्णय झाला नसून एकत्र बैठकीत निर्णय घेतला जाणाऱ असल्याची माहिती ही जयंत पाटलांनी दिली. स्थानिक ठिकाणी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा आढावा घेऊ आणि मगच लॉकलॉऊनचा निर्णय घेणार असल्याचही त्यांनी म्हटलय. लॉकडाऊन वाढवणार का ? असा प्रश्न विचारल्यावर स्थानिक आढावा घेऊ, बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि मग लॉकडाऊनचा निर्णय घेऊ असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उद्या राज्य मंत्रीमंडळाची बैठक !

लोकशाही हेल्पलाईन; ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्सचा तुटवडा असल्यास संपर्क साधा