in

‘महाराष्ट्रानं अनेक अस्मानी-सुलतानी संकटाला तोंड दिलं, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत’

‘महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी-सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत. कोरोनाच्या महामारीतदेखील महाराष्ट्र डगमगणार नाही,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला आणि कामगारांना शुभेच्छा दिल्या.

डॉक्टर व आरोग्य सेवेतील प्रत्येक जण आपल्या प्राणाची पर्वा न करता लढत आहेत. जनता संयमाने शासनाचे नियम पाळत आहे. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळून आपला कणखर महाराष्ट्र पुन्हा मोकळा श्वास घेईल हे नक्की, असं जयंत पाटील म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘थोर विभुती आणि समाजसुधारकांचं स्मरण करणं औचित्यपूर्ण’

‘…अन्यथा या देशात मुडद्यांचं राज्य’