in

‘जीव झाला येडापिसा’मधील अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. हेमंत यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

अभिनेता सुप्रित निकमने सोशल मीडिया पोस्टद्वारे हेमंत जोशी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्याने हेमंत यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘काय लिहू आणि कसं लिहू सुचेना.. हेमंत काका नुकताच “जीव झाला येडपिसा” मधून तुम्ही घराघरात पोहोचला होता. लोक तुम्हाला जोशी कमी आणि जीव झाला मधले भावे म्हणून ओळखायला लागले होते. तुमच्या किती आठवणी सांगू तितकं कमी आहे’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. आणि एका क्षणाची आठवण काढत श्रद्धांजली वाहिली आहे.

१९ मे रोजी हेमंत यांनी अखेरचा श्वास घेतला. हेमंत यांनी आजवर अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत ते भावे ही भूमिका साकारत होते. ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘तेंडल्या’, ‘लायब्ररी’, ‘बालगंधर्व’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. रात्रीस खेळ चाले मालिकेतही ते झळकले होते.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sundar Lal Bahuguna Death: चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचं कोरोनाने निधन

अंदामान-निकोबारमध्ये मान्सून दाखल