मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जगभरातील देशांमधील लॉकडाउनच्या स्थितीबाबत माहिती दिली. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केले आहेत. अनेक देशात लॉकडाउन केलं गेलं मात्र सरकारनं त्यांना आर्थिक मदतही केली, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.
‘प्रत्येक देशातील केंद्र सरकारनं ही मदत केली आहे. आपलं केंद्र सरकार काय देणार. अजून राज्याचे हक्काचे पैसै देत नाही, बघा तुमचं वजन वापरून काही मिळतं का, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.
देशाबाहेर कोरोनाची स्थिती भयंकर होत चालली आहे. अनेक ठिकाणी आजही लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादलेले आहेत. पण, आपण राज्यातील जनतेचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन अद्याप तरी लॉकडाऊन केलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी कोरोनाचं राजकारण करू नये. उलट त्यांनी राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांसाठी मदत करण्याची भूमिका घ्यावी”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. फेसबुक लाइव्हवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
Comments
Loading…