in

जो बायडन यांची दूरध्वनीवरुन कोरोनाबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा

सोमवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यामध्ये दूरध्वनीवरून अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या असणारे कोरोना संकट आणि सध्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या मार्गांवर यावेळी चर्चा झाली. ही चर्चा जवळपास अर्धा तास झाली. यामध्ये कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीसाठीच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरही भारत आग्रही दिसला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढण्यासाठी भारतात सुरु असणाऱ्या प्रयत्नांवरही बायडन आणि मोदी यांच्या झालेल्या या चर्चेमध्ये चर्चा झाली. यामध्ये लसीकरण, औषधे आणि आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली जाण्याचा मुद्दाही प्रकाशझोतात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत अमेरिकेकडून देण्यात आलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची भाची करुणा शुक्ला यांचे कोरोनामुळे निधन

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या आजचे दर त्वरित तपासा