in

पासपोर्ट रिन्यू करण्याच्या मागणीसाठी कंगना रनौतची मुंबई उच्च न्यायालयात धाव

अभिनेत्री कंगना रनौतने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत तिने आपला पासपोर्ट नूतनीकरणासाठी प्रादेशिक पासपोर्ट प्राधिकरणाला आदेश देण्याची मागणी केली आहे.

अ‍ॅडव्होकेट रिजवान सिद्दीकी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत रनौतनं सांगितलं की, मुंबईच्या पासपोर्ट प्राधिकरण विभागाने तिचा पासपोर्ट रिन्यू करण्यास नकार दिला. यासाठी वांद्रे पोलिसांनी तिच्यावर देशद्रोहाचे आरोप आणि द्वेषपूर्ण ट्वीट केल्याबद्दल तिच्यावर एफआयआर नोंदविल्याचं कारण तिला देण्यात आलंय. कंगनाने म्हटलं, की ‘धाकड’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी कंगनाला 15 जून ते 30 ऑगस्ट हंगेरीला आणि बुडापेस्टला रवाना व्हायचे होते, मात्र पासपोर्ट सप्टेंबर 2021 पर्यंतच वैध असल्यानं कंगणाला प्रवासात अडचणी येत होत्या. त्यामुळे कंगना ने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मंगळवारी कंगनाच्या याचिकेवर हायकोर्टात तातडीची सुनावणी अपेक्षित आहे. परदेशवारीसाठी परत येण्याच्या तारखेपासून कोणत्याही व्यक्तीची पासपोर्ट हा किमान सहा महिने वैध असणं आवश्यक असतं. अन्यथा त्या व्यक्तीला परदेशी जाण्याची परवानगी मिळत नाही. कंगनाची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे त्यामुळे चित्रपटाचं उर्वरीत चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी कंगनाला तातडीनं ही परदेशवारी करणं आवश्यक असल्यानं तिनं कोर्टाला सांगितलं. दरम्यान, कंगनाच्या या याचिकेवर न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ आज सुनावणी करण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आंबोलीत पर्यटकांवर पोलिसांकडून मज्जाव; पर्यटकांची नाराजी

रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमध्ये मुसळधार पाऊस