अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात ढवळाढवळ झाल्याचे वातावरण आहे. विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटत असताना आता अभिनेत्री कंगना रणौतने यामध्ये उडी घेतली आहे. कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत अनिल देशमुख #AnilDeshmukh आणि उद्धव ठाकरे #UddhavThackeray असे हॅष्टॅग वापरले आहेत.
“जो साधुओं की हत्या और स्त्री का अपमान करे उसका पतन निश्चित है
यह तो सिर्फ़ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या” , असे ट्विट कंगनाने केले आहे.
कंगनाच्या एका चाहत्याने सप्टेंबर 2020 मधील तिचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील घराची तोडफोड केली होती. यानंतर कंगनाने व्हिडीओद्वारे महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर टीका केली होती. आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा टॅग करत कंगनाने ट्विट केले आहे. यामध्ये ‘जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे बघा आणखी काय-काय होते…’, असे म्हटले आहे.
Comments
Loading…