in

कंगना रणौतच्या बॉडीगार्डला लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक

अभिनेत्री कंगना रणौतचा पर्सनल बॉडीगार्ड कुमार हेगडेवर एका मेकअप आर्टिस्टनं लैंगिक अत्याचार केला असून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कुमारनं पिडीतेला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार आणि अनैसर्गिकरित्या शोषण केलं असा धक्कादायक आरोप महिलेनं केला होता. शिवाय त्यानं तिच्याकडून 50 हजार रुपये घेतले ते अद्याप परत केलेले नाहीत असाही दावा तिनं केला. या प्रकरणी तिनं अधिकृत तक्रार देखील दाखल केली होती.

पिडीत महिलेची वैद्यकीय चाचणी आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर डीएन नगर पोलिसांनी 19 मे रोजी रात्री गुन्हा नोंदवला. फिर्यादी महिलेनं केलेल्या तक्रारीनुसार कुमार हेगडे तिला 2013 साली भेटला होता. वर्षभरापूर्वी त्यानं तिला लग्नासाठी मागणी घातली. तिनं होकार दिल्यानंतर हेगडे तिच्या घरी यायचा आणि बळजबरीने तिच्याशी संबंध ठेवायचा. अनेकवेळा त्याने जबरदस्ती केली. 27 एप्रिल रोजी हेगडे तिच्या घरातून रोख रक्कम 50 हजार रुपये घेऊन पळाला. असे आरोप या महिलेने आपल्या तक्रारीत केले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन करणार ‘तो’ अज्ञात व्यक्ती कोण ?

Black Day | १ जूनला देशभरात ‘काळा दिवस’ ; रामदेव बाबांविरोधात डॉक्टर्स आक्रमक