in

तुझं डोकं ठिकाणावर आहे का ? म्हणतं नेटीझन्सने कंगनाला घेतले फैलावर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असते. कोणत्याही मुद्यावर कंगनाची टीव टीव सुरूच असते. आता, कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत, पाकिस्तानचीही स्तुती केलीय. त्यानंतर, नेटीझन्सने कंगनाला फैलावर घेतलं आहे. देशातील कोरोना परिस्थितीवर पाकिस्तानने चिंता व्यक्त करत, भारताच्या मदतीसाठी तयार असल्याचं म्हटलंय. त्यानंतर, कंगनाने ट्विट करुन पाकिस्तानमधील या ट्रेंडचा आदर असल्याच म्हटलं आहे.

“पाकिस्तानात चाललेला टॉप ट्रेंड पाहून फार छान वाटलं.#PakistanStandsWithIndia… भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनानं पाकिस्तानचं कौतुक केलंय. मात्र, तिचं हे कौतुक काही भारतीय नेटकऱ्यांना आवडलं नाही.

तिच्या या ट्विटला नेटीझन्सने चांगलच फैलावर घेतल आहे. एका सोशल मिडिया युजरने तिला तुझं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने

Corona Vaccination: राज्य सरकार मोफत लसीकरण करणार, नवाब मलिक यांची माहिती