in

तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे कोरोनामुळे निधन

तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं आज संगमनेरमध्ये निधन झालं आहे. त्या 82 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे क्वचितच आढळतील. कांताबाईंनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका हुबेहूब वठवल्या. रायगडची राणी हे वगनाट्य त्यातल्या कांताबाई सातारकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे गाजलं.

२००५ मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंना सन्मानित केलं होतं. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यातील कोरोना स्थितीवरून अजित पवारांनी प्रशासनाला दिल्या ६ महत्त्वाच्या सूचना

‘ब्रेक द चेन’चे नियम मोडणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाईट्सवर कारवाई करा